II ओम साई II
देव कुठे चालू होतो?
जिथं विचारांची गती मंदावते,तिथं देव चालू होतो,
जिथं माझ्यातला मी नाहीसा होतो,तिथं देव चालू होतो;
जिथं गोष्टी अनाकालनीय होतात,तिथं देव चालू होतो,
जिथं स्वकष्टित गोष्टी अविश्वसनीय वाटतात,तिथं देव चालू होतो:
जिथे मायेत गुरफटूनहि अलिप्तता येते,तिथं देव चालू होतो,
जिथं वैचारिक स्थिरता येते,तिथं देव चालू होतो;
जिथं अंतर्मुखता शक्तिमान वाटते,तिथं देव चालू होतो,
जिथं निर्जीवात सजीवता वाटते,तिथं देव चालू होतो;
जिथं सर्वधर्मीय,निजधर्मिय वाटतात,तिथं देव चालू होतो,
जिथं अमान्य गोष्टी,सहज मान्य होतात,तिथं देव चालू होतो;
जिथं प्रापंचिक भोग सहज त्यागता येतात,तिथं देव चालू होतो,
जिथे भौतिक पेक्षा आत्मिक आसक्ती फळावते,तिथं देव चालू होतो,
जिथं बुद्धी खुंटते,तिथं देव चालू होतो,
जिथं परमार्था विषयी प्रेम,आस्था,भूक व लीनता येते,तिथं देव चालू होतो;
जिथं जीवनापेक्षा,मोक्षाची ओढ लागते,तिथं देव चालू होतो,
जिथं तो आणि मी,एक होऊन,अहं ब्रम्हास्मि होतात,......
तिथं देवच नव्हे तर दैवत्व चालू होत.....!!!!!
चारुदत्त अघोर.(दि.४/८/१०)