सरीची आस
उन फार झालंय
तन मन जळतंय
तहानही लागलीये
कासावीस होतंय
वाट बघतंय वाऱ्याची
सुखद नि आल्हाद
हवा हवा वाटे
सावलीचा तो प्रसाद
सरीची आस
ओलाव्याचा ध्यास
तहान भागवायला
पाण्याची बरसात
डोळ्यांना हवा
हिरवागार गालीचा
मऊ मऊ थंड
शत्रू जणू आगीचा
चातकाची ओढ
पाऊस घनघोर
काळ्या काळ्या ढगासाठी
नाचे मनमोर[/b]
डॉ.श्रद्धा दिवेकर माने or Sachish[/b][/size][/color]