कर्म
तुझ्या कुपेने देवा,आयुष्याचे इतके दिवस पाहिले,
माहित नाही आता,माझे किती दिवस राहिले;
हर एक श्वास रुपी पुष्पं तुझ्या चरणी मी वाहिले,
सांग देवा कर्म आता, किती कटायचे राहिले..
जणू सगळे क्षण आयुष्याचे पंचभूतांनीच लिहिले,
त्यांच्या सानिध्यातच जसे जीवन सांडत राहिले,
त्यापलीकडचे पाहणे जणू स्वप्नंच माझे राहिले,
सांग देवा कर्म आता,किती कटायचे राहिले..
शरीररूपी चादरीचे,धागे झिजुनी जाहिले,
पळ पळ विणीत धागा हिचा,श्वासाने उसवत पाहीले,
कितुके उन्हाळे पावसाळे,याच अंगांनी नाहिले,
सांग देवा कर्म आता,किती कटायचे राहिले..
किती कर्मकांड-सणवार,करुनी जाहले,
मूर्ती पलीकडल्या तुला बघायचेच राहिले,
नसं रक्तात तुझेच नाम,तीर्थ रुपी वाहिले,
सांग देवा कर्म आता,किती कटायचे राहिले..
मायेत राहूनही जीवास निर्मोहित जीविले ,
कमळ पत्रापारी त्यास अलिप्त मी ठेविले,
तुझ्याच आवरणात,ह्या शरीरास भोगिले,
सांग देवा कर्म आता, किती कटायचे राहिले..
ध्यानस्त बसूंनी,या गणित देहास शून्यीले,
माझ्यातला मी हरवून,तू रुपी मीच राहिले,
कंठी नाद एकवटून,श्वासातूनच अभंग गायिले,
सांग देवा कर्म आता,किती कटायचे राहिले..
अंधार्र्व्यापी जीवात,ओंकरीत किरणे दृष्यीले,
या षड्रिपूंचे सार,अमृती रसून प्राशिले,
आता सांग झाल्या जीवानी,तुझेच चरण ध्यायीले,
सांग देवा कर्म आता,किती कटायचे राहिले..
चारुदत्त अघोर .(दि.७/१/११)