मयुरा........
लाल पिवळी फुले
भुलवी भोळ्या मनाला
चोचीने पक्षी घास भरविती
आपल्या सोनुल्या पिलांना .
गोंडस फुलांचा गंध
लुब्ध करी भ्रमरा
भ्रमराच्या भ्रमणाने
तारुण्य येई कळीला .
भ्रमराच्या सहवासाने
फुलाला आहे मोगरा
खिळवून ठेवल्या त्याने
सर्वांच्या नजरा .
भ्रमराच्या सानिध्यात
काळी देहभान विसरे
कळीचे फुल होताना
परिमल चोहीकडे पसरे .
खट्याळ मयूर हा
फुलवी पिसारा
डोलवी शिवारा
हा रानवारा .
हर्ष होता अंतरी
फुलवी हा पिसारा
फुलवेलिच्या माथ्यावर
जणू डोलतोय तुरा .
ग्रीष्म मासी बहार येई
गुलमोहरा
जणू बागेतील कारंजा नाचवी
स्वच्छंदी मयुरा .
मुक्तपणे बागडू दे
तुझ्या मनातील मयुरा
खडकातून वाहतो जसा
स्वच्छ, निर्मल झरा .
छेदितसे मज अंगाला
अवखळ ,अल्लड वारा
थुईथुई पडती पाऊसधारा
तुझा मन वेधक पिसारा
फुलाव रे मयुरा .....
( ***** दिगंबर *****)