स्वप्नात साक्षात ईश्वर दिसलाम्हणला माग काय मागायचे तुलादेवा एक मुलाखत द्या मलाका कलीयुगात जगाला विसरला?तुम्हीच तर वचन दिले गीतेतूनदुष्टांच्या विनाशा याल परतूनकाय मिळाले ह्या विश्वासातून?धर्म रसातळाला चालला जगातूनअजाण आहेस तू, ईश्वर हसलाअरे माझे बोल आठवतात मलाधर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला?पुन्हा मी धरतीवर अवतरायलासंकटात का होइना, लोक हात जोडतातधर्माच्या नावाने दान करतातचर्च, मशीदी, मंदीरात ध्यान करताततरीही धर्म बुडतोय का म्हणतात?देवा तुम्हाला आहे सारे ज्ञातलोक लबाड लुच्चे एकजातमंदीर मशीदीवरून भांडतातसज्जनांना संकटी टाकतातधर्माच्या नांवाने खात सुटतातधर्मासाठी जीवावर उठतातधर्माची ग्लानी नाही असे का म्हणता?देवा ह्या प्रकाराकडे दुर्लक्ष करता?अरे ह्या समस्या केल्या मानवानेआणि मानवच सोडवील शहाणपणानेमी जन्माला घालतो सत् आणि असत् जनत्यांची बुद्धी व आकांक्षा करतील समाधानअसल्या क्षुल्लक कामासाठीकशाला अवतारू कुणापोटी?मानवाची जीद्द आहे मोठीत्यानेच उंचवावी मानवतेची गुढीमला अवतार जर घ्यावाच लागलातर मी म्हणीन मानव हरलाकिंबहुना माझा पण पराभव झालाकारण दुर्जनांपुढे मानव झुकलाअसा भयानक प्रसंग जगभर आलातरच मी येईल सहाय्यालाजागेन माझ्या शब्दालापण तुम्ही टाळा ह्या नामुश्कीलाअरे नाकर्त्यांनो, मी दिली आहे तुम्हालाअसीम शक्ती असत्याशी लढायलारडत न बसता, करूणा न भाकताशिका ती योग्यतेने वापरायलाजागृत ठेवा इश्वर अंतरंगातलानाही लागणार अवताराची वाट पहायलापळतील दुष्ट घाबरून तुम्हालाअसतील करोडो ईश्वर दुष्ट्संहारालाऐकूनी कठोर वाचा झोप माझी उडालीमुलाखत आगळी ती गूढ उकलूनी गेलीईश्वरी सुप्त शक्ती, मनुजांतरात वसतेदुष्टमर्जनाला धावून खचीत येतेमुन्ना बागुल