मन आणि हृदय
मनाचं बंड सुरु झालंय हृदयाशी,
अचानक पटेनासं झालंय दोघांच एकमेकांशी.
मनाने घेतला पवित्रा बोलू लागला हृदयाशी,
नेहमीच तू स्वत:च्या मर्जी प्रमाणे वागतोस,
चार चौघात मग माझी लाजच घालवतोस.
असं रे तू कसं काय म्हणतोस?
श्वास जरी माझे असले तरी सगळे आदेश तूच देतोस,
आणि मी मर्जी प्रमाणे वागतो म्हणून मलाच वर दोष देतोस.
किती वेळ तुला सांगितलं Always be Practical in life,
Don’t get Emotional Fool, तरी पुन्हा त्याच चुका करतोस,
नको त्या आठवणींना सांग ना का कवटाळून बसतोस.
मी तरी काय करू रे हवं ते मिळत नाही
आणि उपेक्षा पाठलाग सोडत नाही,
आठवणीच काय त्या मला साथ देतात.
नको करूस यापुढे कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास,
तुझ्या अश्या वागण्याचा त्रास आम्हांला रे होतो,
दरवेळी तुझ्या रडण्याने जीव आमचा तीळ तीळ तुटतो.
खरं सांगायचं तर माझा ही नाईलाज असतो,
आशेच्या हिंदोळ्यावर मी नेहमीच झुलत असतो,
परतून येणार नाही प्रीती तरी वाट पाहत राहतो.
अरे जे मिळणार नाही त्यामागे का तू असा धावतोस,
समजून ही सारे काही मुर्खासारखाच वागतोस,
स्वत:सकट मग आमचा ही छळवाद मांडतोयस.
काय रे तुम्ही दोघं असे कशाला भांडताय?
योग्य मार्ग दाखविण्याऐवजी मला अजूनच confuse करताय.
मनाच्या जागी मन आणि हृदयाच्या जागी हृदय योग्य!
पण तुम्हीच मला सांगा अश्यावेळी मी काय करायचं?
मन आणि हृदय यापैकी नक्की कोणाचं ऐकायचं?
- संतोषी साळस्कर.