श्रावणसर...
श्रावण वेड्या सरींना,
झुळूक वाऱ्याची लागता,
सरसर धारा बरसती,
डोळ्यांची पाती लवता....
श्रावण वेड्या मेघांना,
स्पर्श वाऱ्याचा होता,
वर्षाव मोत्यांचा होतो,
कोकीळ गीत गाते......
गवताचे पाते डोलते,
वाऱ्याच्या तालावर,
पाखरण पिलांवर अन,
श्रावणसर अंगावर......
गोठ्यात हंबरती गाई,
वासरे तया बिलगती,
मनोहर श्रावणसर,
आनंद लोचना देती.....
दिगंबर