तडजोड
माझ्या मनाचा कोड्मारा होतो,
त्याची पर्वा कुणालाच नाही,
माझ्या मनाला वाळवांटाचे रूप आले,
याची तमा कुणालाच नाही...
हक्क आणि स्वातंत्र मिळविणे,
तडजोडीने आता शक्य नाही,
ते वाममार्गाने मिळविल्याशिवाय,
मनासमोर दुसरा पर्यायही नाही.....
एकतर्फी तडजोड करणे,
अन तू मनमानी करावी,
अंत याचा झालाच पाहिजे,
संशय तुझ्या मनीचा लोपलाच पाहिजे.........
चरे पडलेल्या तुझ्या मनात,
आहे माझे प्रतिबिंब भंगले,
तडे गेलेल्या तुझ्या ( मन ) आरशाचे,
आहे अस्तित्व आता संपले......
दिगंबर