खोपा
आकाशी विहारे,
पक्षांचा ताफा,
सुगरण विणते,
झाडावरी खोपा.....
चोचीने भरविते,
सुगरण पिला,
जशी आई भरविते,
आपल्या तान्हुल्या मुला.....
मुले आईला विसरत नाही,
विसरतात ती पिल्ले,
या कृतज्ञ मुलांना पाहून,
सुगरणीचे डोळे पाणावले....
पिलांना पंख फुटताच,
ते आकाशाकडे झेपावतात,
स्वतंत्रपणे या आकाशात,
ते मुक्तपणे विहरतात.......
कालांतराने सुगरण हि,
आपले दु:ख विसरू लागते,
नवीन पिलांना जन्म देण्या,
नवा खोपा विणू लागते......
दिगंबर....