आज सार्या आठवणींनी मन गेले भरूनी
आज या सांज वेळी स्वर आले दुरूनी
सप्त स्वरांची मैफल जमली, एकच स्वर मात्र खुणावतो
"मी वर्ज्य असलो, तरी मला आत येऊदे", म्हणतो
आत येताच कृतज्ञतेने त्याने केले स्मित
पण त्याच्या अस्तित्वाने सारेच झाले स्तिमित
सारेच जरा हिरमुसले, वाटले, रंगाचा बेरंग होईल
एका वर्ज्य स्वरामुळे आपले पावित्र्य भंग होईल
पण त्याची गोडी इतरांत इतकी बेमालूम मिसळली
की त्याच्या तिथे येण्याने सारी सांजच सूरमयी होउन गेली