मला पाऊस भेटला, मला पाऊस भेटला
ओल्या सहस्त्र धारांनी माझ्या अंगाशी खेटला
सूर्य मेघांनी झाकला, आज तरूही वाकला
ओला नवाच काळोख मेघा-मेघात साठला
मला पाऊस भेटला
आज चिंब मी जाहले, पावसात मी नाहले
एक वेगळा आनंद आज मनास वाटला
मला पाऊस भेटला
लागे घोर तो मनास, एक आगळा आभास
झाला दूर तो काळोख, नभी उजेड दाटला
मला पाऊस भेटला
- गोजिरी