Author Topic: तो एक गुलमोहर...  (Read 959 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
तो एक गुलमोहर...
« on: February 15, 2011, 02:36:38 PM »
ॐ साईं
तो एक गुलमोहर...
अखेरीस सुरु झाली पानांची सर सर,
बराच घेतला यंदा ऋतूने अवसर;
पुन्हा घेतली एकदा निसर्गाने बहर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...

शुष्क वारे शांतावले,किती रम्य तो प्रहर,
अमृतावून मधुरले,पचवून उन्हाळी जहर,
खळखळावले खडकी उदक,जसे पाण्याचे नहर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...

नाजूक ती मखमली पाने,पालवली जसा मोहर,
सावली जाळवली अंगणी,जणू विणीत शाली-कडास झालर;
शेंडी टोकास कळ्या टपोरल्या,जसा शिगेवर आला पाझर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...

कातर सांज वेळी,सूर्य झाला विसावून ओझर,
झाकोळल्या अंबरी दूरवर होती उडत्या पक्षी नजर;
हृदयी घण्टावला खीणखीणता शृंगारी गजर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...

झाकून टाकली त्याने फांदी पाने,पसरवून सर्वत्र केशर,
एक एक पाकळी लालवली,जशी लाजत्या फुली पाखर;
रंगलं गाव,रंगली वस्ती ,रंगलं अवघं शहर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...

हिरव्या वनी उभा तो,जशी एक मशाल भडकती प्रखर,
शब्द पंक्ती ओसंड्ल्या त्याने,काढून कवित्वाची कसर;
रेशमून मनाला प्रणयीत केले,घसरावून नियतीची लहर,
खरच मनी केशारवून गेला तो एक गुलमोहर...
चारुदत्त अघोर.(दि.७/२/११)
Marathi Kavita : मराठी कविता