Author Topic: तो एक क्षण निवांत.  (Read 3049 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
तो एक क्षण निवांत.
« on: February 17, 2011, 01:54:40 PM »
ओम साई
तो एक क्षण निवांत.

वैताग या जीवाला,नाही कसलीच उसंत,
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.

असावं माझाच विश्व,जिथे माझा मीच महंत,
काव्यरूपी करावा एक एक शब्द रवंत;
चेतनावी भावना लहरी,सापडावी एक,ति नसं जिवंत,
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.

काय मजसी घ्यायचे जगाचे,का बाळगू नसली खंत,
चार ऋतू अंगीकृत व्हावे,धनावून मजला श्रीमंत;
या निसर्गाचा होवे मीच एक आसमंत,
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.

थकते नजर पाहून, जे धावते जीव जंत,
ज्यांना लौकिक धनप्राप्ती, हेची देव वा संत;
जीवनाचा करायचा काय असाच धावून अंत?,
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.

कुठे तो पळ,जो खुलवेल माझी हर भ्रांत,
ओलावून माझ्या मनास,करेल जो शांत;
शब्दावून रचेल एक कहाणी,जी नसेल कथा-दंत,
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.

हवा तो पळ,जो असेल स्वयं जीवन,ज्वलंत..,
माझ्यातला "मीच"दाखवेल साक्षात मूर्तिमंत;
रेखाटेल जो माझं "मी" पण,अथ पासून इति पर्यंत;
मनास हवा स्वतःचा,'तोच'एक क्षण निवांत.
चारुदत्त अघोर.(दि.३/२/११)

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):