Author Topic: चपळ मन माझे  (Read 922 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
चपळ मन माझे
« on: February 18, 2011, 04:30:12 PM »
ओम साई                                                                                     
चपळ मन माझे.
क्षणी भ्रमन्ते सागरी,क्षणी उंच पर्वत शिखरी,
पळी कुरवाळे स्वतःस,पळी निष्कारण पोखरी,
कधी शून्यात रिक्त्वी,कधी गायी शुद्ध वैखरी;
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

एकान्ति उदासे कधी हे,कधी हासे परोपरी,
कधी पडे निपचित,कधी भटके घरोघरी,
पळी साशंक होई,पळी निर्धास्त बालकापरी,
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

रडे कधी जागेस्तव,कधी विराजे ब्रम्हांडावरी ,
कधी शुष्क होई,कधी बरसवी श्रावण सरी,
क्षणी उथळ वाटे, क्षणी भासे खोल दरी,
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

रुक्ष दगड बनी कधी,कधी नयनी अश्रू भरी,
स्वप्नी रंगुनी नाचे पळी,पन्खाउनी गगनपरी;
कधी दुष्टावे स्वतःस,कधी गहिवरवी काळीज उरी,
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

गतिमंद होई केंव्हा,कधी धावत वेग धरी,
मवाळ वागे क्षणी कधी,क्षणी तेज धारी सुरी;
कधी होऊनी रुग्ण पडे,कधी बनुनी वैद्य तारी;
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

शत्रूत्वी कधी स्वतःस,कधी स्वतःच बने कैवारी;
प्रीतवून कधी जीवास,लुटवी सर्वस्व प्रितीवरी;
क्षणी विसरुनी भान याचे,येई क्षणी भानावरी,
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.

विष-नाग हे मन दयाळा,तूच जयाचा मदारी,
काटीशी कर्म याचे,नामस्मरुनी चिंतनी आरी;
विलवुनी चित्ती एकाग्री,ब्रम्हवी यासी ओंकारी;
चपळ मन माझे देवा,न आवरे खरो खरी.
चारुदत्त अघोर.(दि.३०/१/११)Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: चपळ मन माझे
« Reply #1 on: February 22, 2011, 09:46:21 AM »
मन किती चपळ असले तरी तुमची कविता वाचातान एकाग्र मात्र होते