बरेच दिवस मला पावसाने हेरले
पण एक दिवस मला पावसाने घेरले
पहाटे त्याची भूपाळी ऐकून मी उठले
थंड गार वार्यात मी पार गोठले
घराबाहेर पडण्याचा काहीच नव्हता मोका
पाउस माझा पाहूणा होता, त्याचे आतिथ्य करायला नको का?
मी पावसाशी खूप बोलले, मी पावसाशी खूप खेळले
भांडले ही त्याच्याशी, पण पुन्हा पाउल त्याच्याकडेच वळले
दिवसभर पावसाशी माझी छान जमली गट्टी
खोटा पैसा दिला तरी सर आली मोठी
रात्री मला झोपवताना अंगाई गाऊन गेला
स्वप्नात येऊन त्याच्या घरचे निमंत्रण देउन गेला