ॐ साईं.
“तेच माझं घर.”
किती रम्य स्वप्नं रंगते मनी,
रंगताच हिरवळ खुलते वनी;
उतावळ्या मनी फुटतो पाझर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
दूर कुठे त्या उंच ढळंणावर,
सहज पाउली,नागमोडी वळणावर;
झडल्या पानांची असावी सर सर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
दिसताच उतरवा शीण पाहुण्याचा,
जीव त्यांचा, करावा राहण्याचा;
अंगणी तुळशीची असावी नजर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
असावी जाळीदार नारळाची सावली,
थंड गार मखमल गवतावं पावली;
फुल्बाबागेचा रंगीत पसरतां पदर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
खुली हवेशीर असावी पडवी,
झुलायला बंगी ऐसपैस आडवी,
देव-रूप पाहुण्यांनी गुंजावा-गजर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
पहाटे सुर्यानि किरणावं सोनेरी,
रात्री चंद्रानी निळावं चंदेरी;
पौर्णीमी चंद्र, नारळ फांदी ओझर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
असावा उंच कोंबडी मनोरा,
दिसावा पायथी सागर किनारा,
अंगणी पाकळावा केशरी गुलमोहर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
सकाळी मोगरा,सुगंधून खुलावा,
रातराणीने दरवळून,झुला झुलवा;
चमकावी चंद्रानी,कौलांची उतर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
भिजल्या मातीचा,सुवास चीम्बवी,
मोहरल्या आंब्यास,दव थेम्बवी;
भूपाळी गीतांनी नादावे स्वर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
दारी वास्तुची स्वागती मखर,
चैतन्य,प्रसन्नतेचं वलय प्रखर;
जिथे लंबोदर,लक्ष्मी,दत्ताचा वर,
टेकडीवर टुमदार,तेच माझं घर.
चारुदत्त अघोर(२५/२/११)