Author Topic: पानगळ,  (Read 2859 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
पानगळ,
« on: March 08, 2011, 08:27:07 AM »
II ओम साई II
पानगळ,
सर्व  कलांनी  तापत  असलेला  सूर्य, थोडा  मावळत  होता,
इतक्या शुष्क वातावरणातही, माझा पालवणारा स्वभाव, मलाच कळत नव्हता;
कारण त्या कोरड्या हवेत, रस्त्यानं पांघरली होती फक्त सरसरती पानगळ,
अजून तब्बल तीन महिने वाट बघायची होती, खुलण्यास कंच हिरवळ;
रम्य त्या केशरी संध्याकाळी,अंगणातल्या शेंदरी झाडांची पानच ऋतूने हिरावली,
मुळाकडून वरती फिरत गेलेली नजर,एकाच लटकल्या पानावर स्थिरावली;
त्या रिकाम्या झाडाच्या, सुन्या डहाळीवर,ते एकच पान झुल्कावत होतं,
गळलेल्या पान्मित्रांच्या आठवणीने,अर्धा जीव श्वासून हेल्कावत होतं;
जणू पालवीत झाल्यापासून आजपर्यंतच्या,आठवणीने अम्बुस्ल होतं,
ताज्या रसाळ हिरव्या शिरा सुकवून,आज अनुभवांनी ताम्बुस्ल होत;
जड मनानी नजर परतवून, सृष्ठी नियम म्हणत,स्वतःस शांत क्षणभर केलं,
थंड शुभ्र अंथरुणावर गच्चीत झोपलो,तरी चित्ती मात्र पानानं घर केलं;
नकळत परत झाडाकडे पाहिलं,ते चांदण्यात रजतेने दमकत होतं,
आणि ते पान,मधूनच हलत,चंद्र प्रकाशाच्या नितळतेने चमकत होतं;
काहुरीत मनाने,स्वतःशीच वादून अस्वस्थ  निजलो,कि असं का घडलं,
पहाटे कडाडून आळसताच,पाझरून आनंदलो,ते पान माझ्याच उशीवर येऊन पडलं.;
कोणत्या ऋणानुबंधनातुन हे मला बिलगल,जणू ह्याची सर्वांशी नातीच आटली,
खरच,ह्या ऋतूची पानगळ,जरा जिव पिळवटणारिच वाटली...!!!
चारुदत्त अघोर(दि.२८/१२/१०)




Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 851
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: पानगळ,
« Reply #1 on: March 09, 2011, 09:58:07 AM »
फारच छान............... 8)

Offline ajay.navgire

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: पानगळ,
« Reply #2 on: March 10, 2011, 08:37:27 PM »
Khup ch chaan...!!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):