प्रेमवेडा
पाहतो वाट जशी चातक पावसाच्या च्या मिलनाची
पाहतो वाट तशी मी तुझ्या मिलनाची
भटकतो कस्तुरीमृग जसा शोधात कस्तुरीच्या
भटकतो तसा मी शोधात तुझ्या
फिरतो चंद्र जसा त्या पृथ्वीच्या भोवती
फिरतो तसा मी तुझ्या घराच्या भोवती
होत नाही मिलन जसे दिवस आणि रात्रीचे
होत नाही मिलन तसे तुझे आणि माझे
जवळ जाता जाते दूर क्षितीज जसे
जवळ जाता तुझ्या जातेस दूर तसे
जाऊनी भेटते नदी जशी त्या समुद्राला
तशी येऊनी तू एकदाची भेट मला
नाहीतर विसरते जसे प्राण शरिराला
तशी विसर तू कायमची मला
कवी
निलेश बामणे