वादळ
वादळ होऊन तू
माझ्या जीवनात आलीस
माझ्या हृद्याच दार
तोडून निघून गेलीस
माझ्या हृदयात आता
कोणीही कधीही शिरत
वाटेल तसा हैदोस
घालून निघून जात
विखुरलेलं माझं हृदय
मी सावरत बसतो
विनाकारण आठवणीत तुझ्या
अश्रू गाळत राहतो
हृदयाला नवीन दार
लावून घ्याव म्हणतो
पुन्हा वादळ येईल
नको नकोसा विचार येतो
कवी
निलेश बामणे