जखम
कोणीतरी याव
जीवनात माझ्या चोर पावलांनी
हळुवार हृदयाच्या
जखमेवरील खपली काढावी
वाहू लागता
प्रेम भला- भला जखमेतुनी
जखमेवर त्या
प्रेमाने फुंकर घालावी
बरी होईपर्यंत
जखम काळजी घेऊनी
होताच बरी
दुसरी जखम द्यावी
घातली फुंकर
किती जरी प्रेमातुनी
जीवनाच्या अंतापर्यंत
बरी न व्हावी
कवी
निलेश बामणे