मेनका
बसमध्ये एकदाच ती मला भेटली
माझ्याकडे पहात गालात खुदकन हसली
मला वाटलं ती माझ्या प्रेमात पडली
प्रेम कसलं माझ्या तोंडाला कालिक फासली
मी तिच्या मागे लागलोय सांगत सुटली
बातमी उडता उडता माझ्या घरी पोहचली
कोणाच्या मागे लागलायस विचारणा झाली
मी मग रागात म्हणालो मला एक मेनका भेटली
माझी तपस्या भंग करून गेली
काही न देता माझी अब्रू घेऊन गेली
कवी
निलेश बामणे