भुरळ
तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत
तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त
माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार ............
तिच हसण लाजण चालण वागण आणि बोलण
तिचा जात धर्म कुल आणि गोत्र सारच
गौण होत फक्त तिच्या सौंदर्यासमोर ..........
माझी तत्वे चुलीत गेली माझे महान विचार
भंगारात जाऊन माझी अब्रू चव्हाट्यावर
आली तरी चालेल तिच्यासाठी जगासमोर .........
मला उगडा करून चौकात टांगला तरी चालेल
फक्त ती नजरेसमोर असायला हवीच
मला टांगलेल पाहताना जगासमोर .........
जे मिळविण्यासाठीच असत त्यासाठी प्राण दिल्यावर
तिच्या डोळ्यातील दोन अश्रू टप टप टप गाळायलाच
हवेत मोल्यावान माझ्या मृत देहावर ............
मान उडवत वेडा कुठला म्हणत रोज
तिच्या नाजूक हातून दोन फुल
पडायलाच हवीत माझ्या समाधीवर ..........
कवी
निलेश बामणे