Author Topic: तो ......... काय माहित कोण  (Read 1105 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
तो ......... काय माहित कोण
« on: March 26, 2011, 10:09:28 AM »
तो कोण होता, कुठून आलेला , कुणासही माहित नव्हते,
आणि त्याला ओळखत नाही असे कुणीच सोसायटीत नव्हते.
चाळीच्या टोकाला एकटाच राहायचा,
जरी वेगळा होता तरी वेगळा नाही वाटायचा.
उगीच हातात काठी घेऊन चौकीदारी करायचा,
आणि त्याचा बक्षिश म्हणून सावंत काकींकडे न्याहारीही करायचा.
 
त्याचा वेष अगदीच बरा नव्हता,
पायात तुटकी चप्पल,कमरेला थोटा लेंगा,
आणि अंगात मळका सदरा होता.
पोशाख जरी फटका पण माणूस अगदी खरा होता.
त्या दिवशीचच बघा,
पाणी भरताना राणे काकूंची अंगठी हरवली होती,
शोध शोध शोधली तरी काही सापडली नव्हती.
ह्याला जेव्हा सापडली तेव्हा ती त्याने नेऊन दिली त्यांना,
अहो! ह्यालाच तर सच्चा  माणूस म्हणतात ना.
कोणी त्याला वेडा म्हणायचे, कोणी म्हणायचे पागल,
पण तोच एकटा होता ज्याने जगण्याचाच बदलून घेतला होता angel  .
 
लहान मुले तर त्याला आवडायची फार,
पण काय माहित कुठे होतं त्याचा घरदार.
आणि कुणी विचारलंच हटकून जर,
म्हणायचा हेच माझं घर, इथली मानसं माझी नातेवाईक,
मला कुठे आलंय वेगळं जग, तुम्हीच माझे जिवलग.
 
सारं काही वेगळंच होतं त्याचं,
आपलं असं काहीच तर नव्हतं स्वतःचं.
नेहमीच तो दुसऱ्यांसाठी काही ना काही करत असायचा,
काय माहित शांतपणे केव्हा तो बसायचा,
आणि त्याला विचारलं तर फक्त हसायचा.
म्हणायचा मला यातच आनंद आहे,
स्वतःसाठी सगळेच जगतात,
इतरांसाठी जगण्याचा माझा हा छंद आहे.
मागच्या महिन्यात तर म्हणे,
तो रात्रीचा उठून कुणासाठी तरी मदतीला धावला होता,
अंगात फार ताप होता तरी पुढे सरसावला होता.
नेहमीच तो असंच काहीतरी करत असायचा,
इतरांना मोती देऊन स्वतःकडे ठेवायचा काचा.
 
 
पप्या आणि पिंकीची त्याला माहित असायची लफडी,
त्या बदल्यात पप्या त्याला रोज द्यायचा एक विडी.
कोणी जरी ओरडले तरी शांत बसून राहायचा,
पण जात धर्म विसरून, दिवाळी असो वा ईद,
सगळ्यात मिसळून जायचा.
कुणीच कधी पाहिलं नाही त्याला हात जोडताना देवाला,
जात धरम सब जुठ है, असं एकदा निसटता बोलून गेला.
रडताना तर त्याला कोणीच पाहिलं नव्हतं,
सदा हसते रहो, या उक्तीला त्याने स्वतःला वाहिलं होतं.
माणसातला माणूस त्याने जाणला होता,
जरी तो नव्हता कुणाचाच तरी प्रत्येकात भिनला होता.
 
एक दिवस रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही,
त्या दिवशी सकाळी कुणाकडेही चहासाठी  gas पेटलाच नाही.
त्याचावर राग करणारे पाटील काका हट्टी,
त्यांनीही त्या दिवशी टाकली होती सुट्टी.
कुणाचाही नसलेला तो पण सर्वांना घोर लाऊन गेला,
धस्स झालं होतं काळजात आणि चूक चूक किडा चावून गेला.
जात धर्म माहित नसलेला तो अंत्य संस्काराचं टाकून गेला कोडं,
पण हसत होतं मेल्यावरही, जणू बघतोय कोणतं स्वप्न गोड.
 
चार दिवस झाले बंद आहे चाळीची चौकीदारी,
आणि फुकट जातेय सकाळची सावंत काकिनकडची न्याहारी.
   ....अमोल

Marathi Kavita : मराठी कविता

तो ......... काय माहित कोण
« on: March 26, 2011, 10:09:28 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):