देवा...
दुखता-खुपता कोठे मुखी येते आई ग..!
आश्चर्य वाटता आम्हाला..क्षणार्धात बाप रे..!
अन कीव करताना कोणाची..हाय रे देवा..!
काय रे देवा...!
कसं रे तुला बघवत हे सगळं..
तुज नाव करून लोक कसं काहीही खपवतात..
बर आता तुज नाव वापरलंच आहे..
तर कृतज्ञता म्हणून तुला थोडं फार चिरी-मिरी पण नाही न..!
तसा तू पण काय खूप सज्जन नाहीस हा...
कितीही झाला तरी शेवटी नवसालाच पावणारा तू...
तुला कुठून सुचतात रे कल्पना एवढ्या साऱ्या..
अरे तुझ्या अवतार घेण्याला काही मर्यादा..
कधी मत्स्य..कधी वराह...तर कधी सरळ सरळ नरसिम्हा..!
आधी एवढी भीती घालून ठेवायची मनात...आणि मग व्हायचा..कृष्ण..राम..नाही तर गौतम बुद्ध..!
म्हणजे तू कधी होणार सारथी...तर कधी राजकुमार...कधी तू होणार क्षुद्र कासव...तर कधी होणार भयानक कल्की..!
आता तूच सांग....हि असली रुप तुजी..तुला घाबरून पळायचं..का ओवाळायची तुजी आरती..?
तुज्या सहनशक्तीला काही अंत..?
फक्त १० दिवस म्हणून तू इतक्या आनंदाने मामाच्या गावाला येणार..
आणि तुजा मामा...शकुनी म्हण हवं तर..
११ व्या दिवशी तुला वाजत गाजत...डोक्यावर बसवून वरात काढत...समुद्रकिनारी नेणार..
तरीही काही कमी पडू नये म्हणून परत एकदा आरती करणार..
पुढच्या वर्षी परत यायचं वाचन घेऊन..तिथेच तुला जलसमाधी देणार...
आणि तरीही तो निर्लज्ज मामा..जेव्हा स्वतः बुडायला लागणार...तेव्हा पहिली आठवण तुजीच काढणार...
आणि तू हि भोळ्या...अगदी पहिल्याच हाकेला धावणार...
किती रे रुप तुजी देवा...
कोणाचा तू ईश्वर..कोणाचा अल्लाह..तर कोणाचा येशू..
अन..असेलच नास्तिक कुणी..तर तो तुजा एक सहकारीच..
आता मला सांग देवा...कसं रे जमत तुला असा फोडा-झोडा अन राज्य करा वागणं...
तूच जर आहेस स्वामी तिन्ही जगाचा...तर का नाही रे एकाच रुपात वावरत..?
जरा कठोरच बोलतोय आज तुज्याशी...माहितीये मला..
पण तुला एक सांगू का किस्सा?
कितीही झालं तरी दगडच तू...टाकीचे घाव दिल्याशिवाय तू देव होणार कसा..?
- विजय