उन्हाळा
आगगाडीत बसून मी प्रवास करत होतो
तळपत्या सूर्यास खिडकीत झेलत होतो
गाईगुरे कुरनांमध्ये गवत होते शोधत
जमिनीतील गारव्यास कुत्री होती खोदत
निष्पर्ण वृक्षांमध्ये सावली गेली हरवून
जीवनच सारे जणू गेले होते करपून
जिकडे पहा तिकडे माळराने ओसाड
समोरच्या लेकराने फोडले होते भोकाड
जो तो पहा परेशान घामाने त्रस्त
शीतपेय विक्रेत्यांची मजा होती मस्त
वाजले असतील भर दुपारचे तीन-चार
मधूनच कुठून तरी आला एक विचार
या उन्हाळ्यानंतर जसा येतो पाऊस
दुखानंतर पुरी होई सुखाची हौस
कठीण वेळी माणसाने गाळू नये हातपाय
शांत डोके ठेवून काढा प्रसंगावर उपाय
-स्वप्नील वायचळ