ओठांची भाषा डोळ्यांनी जाणली
संवेदना दूर दूर राहिली
कवितेला सुरुवात तर केली
शेवटची ओळ मात्र राहूनच गेली
कविता लिहिता लिहिताच पुरेवाट झाली
हे लिहायचं, ते राहिलंय करता करता शब्दच हरवलीत
इथे 'त' तर तिथे 'म'
इथे 'प' तर तिथे 'य'
जुळवता जुळवता नाकी नऊ आलीत
वाटल एकदा कविताच फाडून टाकावी
पण कविता कसली फाडतेय
पानच फाडावी लागली
पानांच्या तुकड्यांतून कविता बोलू लागली
आयुष्यात तुला काहीच जमल नाही म्हणून हसायला लागली ...........
- सुषमा