जन्मोजन्मी मला लागली
ओढ माउलीची
धन्य या माय माउलीची
[/b]धन्य या माय माउलीची
आईसारखे दैवत कोणी
जगतावर या दुसरे नाही
वात्सल्याची मूर्ती आई
ममता भरलेली
मला आठवे स्पर्श हातांचा
आईसारख्या त्या देवाचा
महती कळली मजला आता
झाल्यावर आई
या आईने किती सोसले
मोल कधी ना कुणास कळले
माय माउली माझी माउली
माय माउली माझी माउली
[/b]