आईचान सांगते पुण्याची शान
कायरे च्यायला आयला
झम्पक टम्पक कायरे पिंट्या
पुणे तिथे काय उणे पुणे तिथे काय उणे
चहाची किटली अमृत तुल्याची
गुलाबी जोडी कॉलनीतल्या पोरांची
श्रीची खिचडी जोशींचा वडा
पाणीपुरीची गाडी अन शनिवारवाडा
चटकदार मिसळ अन सैम्पल पाव
आजीची खिचडी मार साल्या ताव
चितळेची मिठाई अन चौकात काका हलवाई
तुळशीबागेतील खरेदी अन रे ची मंडई
एफ सी रोड अन प्रभातची गल्ली
बरीस्ताला मिळाली पुण्याची किल्ली
एसपी चा कट्टा अलकाचा पिक्चर
नो एन्ट्रीत घुसलो मारा आता चक्कर
चौका चौकात गणपती अन मारुती
लक्ष्मी रोडचे आवळे चिंचा खाऊ तरी किती
पत्ता विचारा पुणेकराला गल्ल्या तरी किती
रात्री मात्र फिरताना बाळगू नका भीती
[/b]कविता बोडस [/b]