स्वप्नासाठी निद्रा का निद्रेसाठी स्वप्नं
त्या मंद वाऱ्यासोबत आलेला सुगंध
तो आल्हाददायक रजनीचा स्पर्शबंध
पानांची सळसळ फुलांचा तो गंध
मातीचा सुवास पुलकित धुंद
मनातील भावनांचा अविष्कार
रात्रीच होतात स्वप्नांचे चमत्कार
मनातील कवडसे बघायचे रजनीच्या कुशीत
सुंदर स्वप्नांचा असर दिसे पहाटेच्या मिठीत
वेड्या विचारांचा होतो जेव्हा कहर
आठवणींचे तेव्हा उलटून जातात दोन प्रहर
कविता बोडस