कधी कधी खरच चुकल्या सारख वाटत
जगवलेल्या स्वप्नांना मुकल्या सारख वाटत
मला जे हव होत ते खरच मला मिळाल?
जे मिळाल ते अगदी अगदी नवख वाटत
कधी कधी खरच चुकल्या सारख वाटत
आजही आठवतात त्याच जुन्या वाटा
परत त्याच वळणावरती भटकावस वाटत
कधी कधी खरच चुकल्या सारख वाटत
तोच जुना शहर, तोच गर्दीचा कहर
त्याच जगात परत परत जगावस वाटत
कधी कधी खरच चुकल्या सारख वाटत
मला इथे यायचं होत? चुकूनच आलो असावं
पुढे पुढे जातांना वळून पहावास वाटत
कधी कधी खरच चुकल्या सारख वाटत
......दिनेश बेलसरे....