Author Topic: मी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,  (Read 2402 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 650
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
मी नव्या युगाची नारी, कुणा न घाबरणारी,
जे येईल मनात, ते आणि तेच करणारी.

एकविसाव्या शतकाची मी हि शिलेदार,
संकटांना झुकविण्यासाठी आता मी हि लढणार.
मी नाही केवळ कोमल कळी गंधित,
मी आही मर्दानी, खेळते खेळ रक्त रंजित.
मी जिजाऊ शिवबाची मार्ग दाखवणारी,
मी सावित्री युगाची अक्षर शिकविणारी,
मी राणी झाशीची हाती तलवार पेलणारी.

मी कधी होते मस्तानी शृंगार फुलविणारी,
कधी banded  queen अंगार खुलाविणारी.
मीच mother  teresa ममत्वासाठी  प्रिय,
मीच इंदिरा होते राजकारणी सक्रीय.
मीच किरण बेदी विजार घालून गुंड पकडणारी,
मीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नव्वारी नेसणारी

मी सौंदर्यवती अप्सरा, गोड शब्दांचा झरा,
पुरुषास पुरुषत्व सिद्ध करण्या आधार माझा खरा.
मीच जन्म देते अन भागवते पहिली भूक,
कधी पत्नी, कधी आई बनून क्षमा करते प्रत्येक चूक.
ज्यास देते अस्तित्व त्याच्याशीच माझी लढाई,
त्याच्या नजरी केवळ मी फक्त एक बाई.
जरी modern  झाले तरी मी तीच राबणारी, गोड खाऊ घालणारी.

कानास सतत mobile , खांद्यावरी जड laptop .
मी हि वावरते पुरुषासारखी घालून जीन्स top .
मी विसरत नाही संस्कार कधी शालीनतेचा,
पण पुरुषी डोळा सदा वेध घेई चारित्र्याचा.
माझ्या madam पणा मागे एक लपलेली असते आई,
अभिमान आहे मला कि मातृत्व पुरुषाकडे नाही.
मी आज नाही परावलंबी, नाही आधारासाठी धडपडणारी.

माझीही असते धावपळ ह्या corporate  क्षेत्रात.
मीही काळीज टाकून येते मागे, जीव जणू कात्रीत.
मी हि आहे पुरुषाच्या खांद्यास खांदा लावणारी,
कसले ना बंधन आता घेतली उंचच उंच भरारी.
मी नाही आता अबला केवळ रडणारी.

मीच सरस्वती ज्ञानाची देवी,
मीच अभंग जनाईची ओवी.
मीच किरण सूर्याचे, मी तळपणारा दीप,
मीच अक्षर, मीच शाही, लेखणीची निप.
गवसली मला शिक्षणाची तलवार,
आकाशाला सुद्धा मी झुकविणार अलवार.
मी तीच, वणवा पेटवणारी राखेखालची चिंगारी.

   माँ तुजे सलाम!!!  ..अमोल


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):