बोलता बोलता
बोलता बोलता वाक्य कधी पूर्ण होत नाही,
बोलण्याचा अर्थ बोलणार्यलाचलागत नाही.
बोलता बोलता चेष्टेचे वाद कधी संपत नाही,
वादशिवाय तुझयाशी बोलण्याचा वेळही वाढत नाही.
बोलता बोलता बाजुछ जग स्पर्शात नाही
जग म्हणजे तरी काय याचे भान ही उरत नाही.
बोलता बोलता डोळ्यांचा लपंडाव संपत नाही
लपंडावात जिंकते कोण याचा निकालही लागत नाही.
डॉ. पल्लवी डोंगरे