पावसाच्या सरी याव्या
माझ्या घरी
व्हावे ओलेचिँब अन्
धुंद या अवसरी
मातीचा सुगंध दरवळावा असा
जणु आकाशी विहरणारा
मुक्त पाखरांचा थवा
मेघ यावे दाटूनी
विज जावी कडाडूनी
वाढावा पावसाचा वेग
भिजावी अवनी सारी चिँब
बेभान व्हावे पाहताना निसर्गाचे
हे विलोभनीय दृश्य
ओसरता ओसरता
पावसाने देऊन जावे
एक छानशे इंद्रधनुष्य !
-ट्विंकल देशपांडे