Author Topic: पाऊस - निलेश बामणे  (Read 1079 times)

Offline bamne nilesh

  • Newbie
  • *
  • Posts: 27
पाऊस - निलेश बामणे
« on: June 06, 2011, 07:05:47 PM »
पाऊस

पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो ...

मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा ...

पाऊस मुठीत पकडण केवळ अशक्य....त्याला फक्त ओंजळीतच जमा करता येत तिच्या आठवणीं सारख .....

ह्ल्ली भरोसा मी पावसावरही ठेवत नाही... कारण तो ही बेभरोवश्याचा झालाय तिच्यासारखा....

पाऊस तो येण्याची चाहुल सारखी देतो... उत्साह वाढवतो.... पण ! येण टाळ्तो तिच्यासारख.....

पाऊस मला आवडातो कारण तो सर्वांसाठी सारखा असतो त्याच्यात मिसळलेले माझे अश्रु तो तिच्यापर्यत पोहचवतो....

पाऊस पडला की ती मला भेटत नाही.... फोन करते आणि म्हणते ...पावसाच पाणी आज खारट लागत होत ना .....

नाही मला गोडच लागल............माझ उत्तर असव फुसत दिलेल.......असत....खोटच...

 

कवी

निलेश बामणे

Marathi Kavita : मराठी कविता