माझे मन
थोडे वेडे
थोडे सैरभैर,
कधी निराश
कधी आनंदी,
कधी उदास
कधी खट्याळ,
आज इथे
उद्या तिथे,
कधी पाण्यात
कधी आकाशात,
हरवते कधी कधी
इंद्रधनुष्यात,
त्याचे जगच निराळे,
त्याच्या ठायी
गमतीँचे मळे,
भावभावनांचे
खेळ खेळे,
शांत राहणे
त्यास न कळे,
वाऱ्यागत सर्वत्र
बागडत फिरे,
रडता-रडता
सातमजली हसे,
त्याने जपून ठेवलीत
आठवणींची मोरपिसे,
आठवणींत मला
तू दिसे,
तू दिसताच
माझे मन
खट्याळ हसले:-)
-ट्विँकल देशपांडे.