Author Topic: मनी काहूर काहूर...  (Read 1101 times)

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
मनी काहूर काहूर...
« on: June 09, 2011, 09:27:22 PM »
.
मनी काहूर काहूर
किती प्रश्नांचे दाटले,
असे कसे पुन्हा पुन्हा
जगणे नकोसे वाटले,
.
आता रडूही येईना
आसू आटले आटले,
हासु ओठातले माझ्या
कधीच हरवून गेले,
.
सुखानंतर क्षणाच्या
सतत दुःख पदरी आले,
सांग देवा तुझे कसे
दान उलटे पडले?
.
कधी का कळले कुणास
काय प्राक्तनात दडले,
तरीही मनाच्या देव्हारी
आशेचा दिवा लावून बसले,
तरीही मनाच्या देव्हारी
आशेचा दिवा लावून बसले.
.
-ट्विँकल देशपांडे.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: मनी काहूर काहूर...
« Reply #1 on: July 08, 2011, 11:49:41 AM »
khupach chan......

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Re: मनी काहूर काहूर...
« Reply #2 on: July 09, 2011, 04:06:38 AM »
Khup dhanyavad....