त्या आठवणी.....
दिवसामागून दिवस सरतात पण आठवणी मनाच्या कोपरयात तश्याच राहतात,
काही गोड काही कडू अश्या त्या आठवणी...
जीवनाच्या या रहाटगाडग्यात त्या मनाला आनंद आणि उल्हास देऊन जातात,
गेलेल्या त्या क्षणांचा पुरेपूर झाला असताना सुद्धा विचारांच्या रुपात परत येतात अश्या त्या आठवणी...
माणसाच्या सुख-दुखाच्या क्षणांना कैद करतात,
आपल्या माणसाना पुन्हा एकदा अश्या क्षणांनी एकत्र आणतात अश्या त्या आठवणी...
निवांत पहुडलेले असताना त्या मनात जागर घालतात,
असे क्षण पुन्हा एकदा अनुभवावेत म्हणून गळ घालतात अश्या त्या आठवणी...
विचारात रममाण होऊन त्या इतिहासात डोकावतात,
विसरून जाऊन नये म्हणून त्या कधी कधी स्वप्नात येतात अश्या त्या आठवणी...
प्रत्यक्षात का नसेना पण स्वप्नात सर्वांच्या भेटी गाठी घडवतात... अश्या त्या आठवणी..
अश्या क्षणांची शिदोरी त्या नेहमी बांधत असतात,
शेवट पर्यंत अश्या आठवणी माणसाला सोबत करत असतात..
लहान असो व मोठे श्रीमंत असो व गरीब सर्वाना त्या दिलासा देतात आणि भविष्याची कास बांधायला मदत करतात अश्या त्या काही गोड काही कडू आठवणी.. nitin hargude..