कविता कधी अशीच सुचत नाही.....
मनाच्या कोपर्यात कविता कधी अशीच सुचत नाही
कुठे तरी मनात न बोलता सांगणार असत खुप काही.....
मनात घुटुन बसतात व्यक्त होणारे असंख्य शब्द
मन हतबल होउन निपुट पणे पाहत सगळ स्तब्ध.....
फेडन्याची इच्छा असुनही न फेडताच ठेवावी लगतात देणी
अनेक दुख गिळत आपण डोळ्यातलेही थेंब गिलतो मनोमनी.....
जगण्याच नाटक कराव लागत क्षणोक्षणी मरताना
जिंकत आलेल स्वप्न पाहाव लागत कधी हरताना.....
उन्हाचे चटके झेलून अनेकांसाठी झाडाची सावली व्हाव लागत
सार असह्य होउन सुद्धा थेंम्बाना निमूट प्याव लागत.....
अनेक विचार मांडल्यावर मग कागदावर येतात शब्द धाऊन
विचारांच्या जंगलातला वणवा न पेटताच विजतो राहून.....
हे सार सोसल्यावर मग कुठे जन्मते कविता टीच भर
टीच भर असली तरी अनेकांचे गहिवरून आणते मन खर.....
कमलेश गुंजाळ