काही गोष्टी आपल्याला लहानपणीची खूप आठवण आणून देतात....मग मन कुठेतरी आठवणीत रमतं.....एखादी वस्तू शोधण्यासाठी जसे आपण अडगळीच्या खोलीत कधीतरीच जातो तसेच काही आठवणीतही आपण कधी कधीच रमतो......
आठवणीतली अडगळ
अडगळीच्या खोलीत आज एक खेळण्यातली बंदूक सापडली
आठवणींची काही पाने मग काही वर्षांनी मागे पलटली
लहापनीच्या सोनेरी क्षणांची होती ती एक आठवण
हृदयात भरून ठेवलेल्या श्वासांचीच जणू ती साठवण
हातातल्या बंदुकीचा त्यावेळी काय होता सांगू तुम्हाला थाट
लहान मोठेच काय देवालाही कधीकधी दाखवायचो तिचा धाक
बंदूक घेवून चोर पोलीस खेळण्यात दिवस असाच निघून जायचा
चोरांना पकडण्यासाठी बंदुकवाला दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचा
लहानपणीचे अनमोल क्षण त्या बंदुकीत कुठेतरी जडले होते
बंदुकी बरोबरच कुठेतरी आठवणीच्या अडगळीत पडले होते
-गौरव पाटील