.
सांग पावसा येशील का?
आभायाकडे लागले डोले,
वाट पाहून झाले ओले,
.
उन्हाने तापली धरणी माय
तरीही तुझा पत्ता नाय,
तूच सांग मी करू तरी काय
सावकार हयगय करीत नाय,
माझ्यासाठी नाही तुझ्या लेकरांसाठी ये,
तहानलेल्या-भुकेलेल्या
गाई-वासरांसाठी ये,
पुन्हा एकदा नव्या जोमाने पडशील का?
सांग पावसा येशील का?
.
चारा संपला,पाणी संपले
जनावरांचे हाल-हाल झाले,
तुझ्याविना पोळा गेला सुना
सांग काय झाला माझा गुन्हा,
हाक मारीतो पुन्हा-पुन्हा
सांग पावसा येशील का?
.
काल आणखी दोघांनी
स्वर्गवासी होणे पसंत केले,
वाट पाहण्यापेक्षा तुझ्याकडे येणे पसंत केले,
माय कळवळली,
लेकरू रडले,
घरमालकिणीवर आभाळ कोसळले,
आतातरी दया दाखवशील का?
सांग पावसा येशील का?
.
तुझ्यासाठी मन आतुरले,
वाट पाहून चातकपक्षी झाले,
अमृतवर्षा होणार केव्हा?
माझी विनवणी मानशील का?
सांग पावसा येशील का?
.
कर्जाचा डोँगर
आकाशाला भिडला,
घरी खायाला दाणा ना उरला,
सरकारने कर्जमाफीचा वाटाही खाल्ला,
आम्हास कुणी वाली न उरला,
माझा हा त्रागा
तुला न कळला,
सुखाची तहान भागवशील का?
सांग पावसा येशील का?
सांग पावसा येशील का?
.
-ट्विँकल