आज कोल्हापुरात “आयुष्यावर बोलू काही” चा कार्यक्रम झाला. बऱ्याच काळापासून बघत आलेलो स्वप्न आज पूर्ण झाले. सलील आणि संदीप यांनी पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करून सोडले.
त्यांच्यासाठी लिहलेल्या ह्या ओळी
ते आले, त्यांनी पाहिलं
त्यांनी हसवलं, त्यांनी रडवलं
एकदा लहानगं केलं
एकदा तिच्या आठवणीत रमवलं
माझ्या मनातल्या शब्दांना
त्यांनी ओठांवर आणलं
अगदी हेच म्हणायचे मला
असं मनोमनी मी म्हंटलं
ते जसे आले, तसेच निघून गेले
सगळ्यांना मंत्रमुग्ध करून गेले
वर्तमानाला pause आणि
मनाला rewind करून गेले...
- गौरव पाटील