चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारिऊ चापि लई दिसिचक्का
भूप दुरीन दुरे भानी भूषण एक अनेकां बारीधी नक्का
औरंगसाहिको साही के नंद ल्यरो शिव्साही बजाय कै डंका
सिंह कि सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज का धक्का
( चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चातुरांगदालाने चारी
दिशांना आपला अंमल बसवला. कित्येक राजे दर्याखोर्यात लपून बसले. काही समुद्रपार
झाले. पण अशा औरंगशहाविरुद्ध शाहजीनंदन शिवाजी डंके वाजवून लढला. सिंहाच्या
पंजाचा फटकारा सिंहाच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच !!)
दिल्लियदलन दबाई के सिवसरजा निरसंक
लुटी लियो सुरती शहर बंकक्करी अतिडंक
बंकक्करी अति डंकक्करी अति संकक्कुलिखल
सोचच्चकित भरोच्चच्चलिय विमोचच्चखजल
तट्ठई मन कट्ठिक सो रट्ठट्ठिल्लिय
सद्यद्यीसी दिसी मद्यद्यबी भई रद्यद्यील्लिय ||
या शिवाजीने नि :शंकपणे , गर्जना करीत दिल्लीच्या दलाचा परभाव केला. अत्यंत
जोरात दणके पिटून त्याने सुरात शहर लुटले .असा प्रचंड नाद झाल्याने ते दुष्ट
मुघल भयभीत झाले.विचार करीत,अश्रू ढाळीत ते भाडोचकडे निघाले. मनाची पूर्ण तयारी
करून पळण्याची तयारी केली. सर्व दिशात दिल्ली बरबाद झाल्याची खबर गेली .दिल्लीच
रद्दच झाली.
कवी भूषण ह्यांचे छंद