अनुभवलेल्या घटनांची बांधलेली माळ
म्हणजे कविता
सग्या सोयरयांची तुटलेली नाळ
म्हणजे कविता
माझ्या सारख्या स्वच्छंद पक्षाचं
मोकळं आभाळ म्हणजे कविता
जीवापाड जपणाऱ्या आईचं
तान्हं बाळ म्हणजे कविता
क्षितिजा वरचा सूर्याचा थाट म्हणजे कविता
किनार्या वर घेऊन येणारी लाट म्हणजे कविता
माझ्या जगण्याची आस म्हणजे कविता
जगण्यास लागणारा श्वास म्हणजे कविता
ग्रीष्माच्या बरसलेल्या गारा म्हणजे कविता
कलेनं विणलेल्या तारा म्हणजेच
क वी ता
मैत्रेय (अमोल कांबळे)