माझया डोळ्यांतल्या स्वप्नांना..
तुझ्या पापण्यांवर सजवशील का?
विखुरलेल्या अपेक्षांची धुळ गोळा करुन ..
माझी ओंजळ भरशील का?
कुठेतरी दूर पाऊलवाटेवर ..
मला एक साद देशील?
अंधारल्या राती..
माझ्या हाती तुझा हात देशील??
तेज माझ्या डोळ्यांतले ..
विझत जात असताना..
तू..
प्रकाश होऊन येशील?
आकाशात भरारी घेताना,
जर कधी थकले,
माझ्या पंखांना ..पुन्हा उडण्याचं बळं देशील??
जर आलेच अश्रुंचे पूर कधी..
तर त्यांना स्वतःमध्ये सामावून घेणारी..
एक चिंब सर बनून येशील???