ती धुंद निशा..
काळंभोर काजळ रेखलेली..
कॄष्णवस्त्र ल्यायलेली..
ग्रह तारे पांघरलेली..
अन्
अंतरंगी कृष्णविवरं वागवणारी,
दिवस उद्याचा..
रात्र आजची..
यांच्या सीमेवरच ताटकळणारी..
क्षितीजापार..
मिलनोत्सुक सागराशी जुडणारी,
भरतीच्या असंख्य लाटा ..
अतृप्ततेने पिणारी..
मंद मंद समाधानाने तेवत राहणारी..
दिव्याच्या वातीसारखी..
झिरपणारी खोल खोल्
..तृप्ततेच्या हुंकारांमध्ये,
आणि मग पूर्वा उजळू लागते,
काजळ आता खुपू लागतं..,
डोळ्यांतून ओघळू लागत..
कशिदानक्षि चंदेरी ..
बोचरी होते..
शांतपणा अबोली..
आता कलकलाट बनतो..
पिवळी जरीकाठी नेसून,
आता तीच क्षितीजाकडे,..
नव्या रुपात,
स्वतःला बदलून..
पुन्हा त्याच सागराला भेटायला ..
नव्याने..