Author Topic: प्रिय वहिनीस  (Read 2019 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
प्रिय वहिनीस
« on: August 01, 2011, 10:11:32 AM »
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता  ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
आणि तोडून आली कईक तिचे निर्धार मागे,
केवळ जपायला समाजाने बांधून दिलेले रेशमी धागे.

आम्ही जरी एक रक्ताचे तरी विखुरलेले मोती,
ती वेगळ्या रक्ताची तरी आम्हाला बांधत होती.
एकच माळ हवी होती तिला आणि सगळे मोती एकत्र,
आम्हीच दुरावलेलो आतून विसरून एकपणाचे सूत्र.
ती सहज आई, बाबा, दादा, ताई अशा हाका मारत,
होती प्रत्येक नवीन नात्यात आपुलकीने शिरत.

तिने एकलक्ष केले होते येणाऱ्या संकटांशी,
कारण त्याचा थेट संबंध लागणार होता तिच्या पायगुणाशी.
ती घेत होती सर्व झालेले तिच्यावरचे आरोप स्वीकारून,
फक्त घर टिकावं या उद्देशाने मन मारून.
ओंजळीत साठवत  होती मिळालेलं प्रेम थेंबभर,
खरंच वहिनी तू होतीस म्हणून टिकून राहिलं घर.

नाव सुद्धा बदलून घेतलेस नव्या घरात बावरलीस,
राजकुमारी कुण्या घराची इथे दासी म्हणून वावरलीस.
केवळ एकाची पत्नी या नात्याने आलेली तू,
सून, नणंद,भावजय, वहिनी  हि रूपे कशी लागली फुटू.
आता मागे लागलीयेस एक सखी हवी आहे म्हणून,
पण तिला जमेल का गं तुझ्यासारखं जगायला इतरांसाठी जगुन.
 
......अमोल

Marathi Kavita : मराठी कविता