Author Topic: आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.  (Read 2250 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 650
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अळवावरल्या  पाण्याच्या थेंबासारखं असतं आमचं,
क्षणभराचं सुखं, क्षणभराचं दुखंसुद्धा,
तरी सुद्धा खोल खोल भावनेची ओल असते मनात,
आमचं हसणं, रुसणं सारं काही असतं क्षणाचं,
कारण विचारांपेक्षा आम्ही ऐकतो आमच्या हळव्या मनाचं.
क्षणात होतो इंद्रधनू, क्षणात काळोखी रात्र होतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

स्वप्नांना जपतो आम्ही, स्वप्नांना जगतो आम्ही,
तुम्हाला उगीच वाटतं वेड्यासारखं वागतो आम्ही.
स्वप्नांसारखं मधीच भंग पावतो कधी,
स्वप्नांसारखंच नव्याने पुन्हा जन्म घेतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

अधल्या मधल्या गोष्टींशी आमचं जुळतच नाही,
टोकाच्या भूमिकेशिवाय आम्हाला काही कळतंच नाही,
एकदा विश्वास बसला कि काही केल्या उठत नाही,
आणि एकदा विश्वास उठला कि काही केल्या बसत नाही.
प्रेम हि आमचं जिवापार आणि रागही अगदी तीव्र असतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आयुष्यातली प्रत्येक संवेदना आम्हाला स्पर्शून जाते,
निरर्थक गोष्टही आमचा फार वेळ खर्चून जाते,
हव्या त्या गोष्टीत विनाकारण दुर्लक्ष होतो,
पण भोळंभाबडं मन वेगळीकडेच एकलक्ष होतो,
यशअपयशाच्या शर्यतीत आम्ही नेहमी शेवट गाठतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

छत्री असून सुद्धा आम्ही भिजत जातो,
चपला घेऊन हातात चिखलात उगी चालत राहतो,
पाऊस बोलतो आमच्याशी, वारासुद्धा बोलतो,
माती बोलते आमच्याशी, आभाळही मन खोलतं,
जमिनीवरलं हिरवं गवत जणू आमच्यासाठीच डोलतं.
पावसाचा गंध मित्रासारखा आणि ती सर भासते मैत्रीण,
आणि वाटते त्या कडकडनाऱ्या विजेशीही आहे जुनी वीण,
अश्या कईक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आम्हाला तुमच्याकडून हवी असते थोडी माया,
अगदी खर्रखुर्र प्रेम आणि आपुलकीची छाया,
आमचं काळीज तळहातावरती घेऊन फिरतो आम्ही ,
पण तिळाएवढाही खोटेपणा सहन करता येत नाही,
भावनांवर नसतो ताबा आणि आसवांशी पक्क नातं असतं,
दुरावा नको असतो म्हणून मन मनाची जवळीक जपत बसतं.
जरी आम्हाला तुमची गरज तरी सांभाळून घ्या ही विनंती करतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

कधी कधी आम्ही तुमचा राग करतो पण लक्षात ठेवत नाही,
हळवेपणाच्या कक्षेत फार काळ काही टिकतच नाही,
तुम्ही घेता राग साहजिकच तुमच्या मनावर,
पण भावनेच्या भरात आम्हीच नसतो भानावर,
वेळ गेल्यानंतर आमचा व्रण मग चिघळत  जातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अगदी काचेच्या वस्तुसारखी नाजूक,
तुम्हीच जपायचं असतं आम्हाला जिवापार,
नाहीतर आम्ही स्वतः तरी जखमी होतो,
नाहीतर तुम्हाला तरी जखमी करतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.
 
.....अमोल


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
one of ur best poem ........... too good ........ mi hi khupach halavi ahe agadi hya kavite pramanech ............ so khup khup khup avadali .......... thanks ....... keep writing n keep posting :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):