कधी आठवतात हातातले हात
कधी नजरेला भिडलेली नजर,
कधी हृदयाचे चुकलेले ठोके
अन मनी तुझ्याच नावाचा गजर.
कुठे पावसाळी हवा, तर कुठे भिजरी पायवाट,
त वाटेवरल्या तुझ्या पाऊल खुणा, मला नेमक्या आठवतात.
कुठे दिवा स्वप्नं,
तर कुठे रात्रीचा झुरणं,
मी तुझी झाले म्हणताना,
मला अस्तित्वच न उरणं.
मग थोडासा अबोला, थोडासा दुरावा,
तुझ्या डोळ्याला पाण्याची धार, माझ्या हि नजरेत ओलावा.
दोन दिसांचा जीव घेणा अबोला,
तिसर्या दिवशी एक फोने कॉल
तुझं दबलेल्या आवाजात मला विचारणं,
काय म्हणतायत तुमचे हाल हवाल?
तुझं एकच शब्द, अन माझं खुदकन हसणं,
किती सुंदर आहे नाई, आपण एक मेकांचा असणं.
असंच घडत राहील,
आणि दिवस पुढे सरतील,
आपल्या नजर निवांत पणे,
म्हतार पणातच मिळतील.
मी असेन साठीची, तू हि पासष्टीच्या जवळ,
हातात तुझा हात आणि, मनी अनामिक खळबळ.
तरीही तू बदलला नसशील,
शेजारून जाणार्या आज्जीन कडे पाहशील,
पुन्हा मी रुसेन आणि धरेन अबोला,
माझ्या डोळ्यातलं पाणी पुसताना, तुझा हात होईल ओला.
म्हतार पणी सुधा चालेल, खेळ आपुला नेहमीचा,
अन नातवंड पुढे जाऊन गिरवतील, धडा अपुल्याच प्रीती चा.