आले नभ हे भरून
वारा येतो घोंगवून
दूर वीजा चमकती
आले मळभ भरून
येती सरीवर सरी
आज धरतीच्या घरी
पावसान चिंब झाली
आज मन भरू आली
धरतीन पांघरला
हिरवागार बघ शेला
वृक्षा पालवी फुटली
कोंब कोंब अंकुरला
थेंब पिऊन चातक
फिटे जन्माचे पातक
फुलवून पंख मोर
नाचे जसा तो नर्तक
असा आषाढ श्रावण
करी सर्वाना पावन
याच्या कौतुकाच्या पोटी
किती गाऊ मी कवन
..............................................................अमोल कशेळकर