पावसाची पहिली सरी
येती धरतीवरी
पसरतो जो सुगंध
सर्वांच्या मनी वास करी
धरतीवर सुगंध चहूकडे पसरतो
सर्वांना तो हवा हवसा वाटतो
अस्थिर मनाला प्रसन्न करतो
मनामध्ये भावना विभिन्न उमटवतो
विचारांमध्ये कल्पनांचे रंगवतो चित्र
हा असा कसा घातला मेळ विचित्र
सुगंध नसतो दीर्घकालासाठी
असतो तो क्षणभरासाठी
सर्वांना वाटते तो राहावा मनी
म्हणूनच
राहतात त्या 'त्याच्या' आठवणी………